शुभेच्छा! संदेश


    नवनिर्मित पालघर जिल्हयाच्या विकासाचा दृष्टीकोन ठेवुन जिल्हा परिषदेच्या कामकाजामध्ये पारदर्शकता राहण्यासाठी व कामामध्ये गतीमानता येण्यासाठी जिल्हा परिषद पालघरने स्वत: ची वेबसाईट तयार करुन आज ती वेबसाईट सर्वांसाठी खुली करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेतील सर्व विभागामार्फत राबविण्यात येणा-या महत्वाकांक्षी योजनांबाबत माहिती व त्याची छाया चित्रे वेळोवेळी प्राधान्याने वेबसाईटवर अपलोड करण्यात येतात त्यामुळे पालघर जिल्हयाच्या विकासासाठी राबविण्यात योणा-या योजनांची माहिती वेबसाईटवर उपलब्ध असल्याने ती सर्व सामान्य जनते पर्यंत सहजपणे पोहचेल अशी आशा आहे.
    महाराष्ट्रातील इतर जिल्हयांच्या तुलनेत पालघर जिल्हा विविधतेने नटलेला असून खेडया पाडया पर्यंत, द-या खो-यांमध्ये विखुरलेला आहे. पालघर जिल्हयामध्ये आदिवासींची संख्या निरक्षरांची टक्केवारी जास्त आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालघर जिल्हा मार्च 2017 पर्यंत हगणदारीमुक्त करण्याचा निर्धार करणेत आलेला आहे. या महत्वाकांक्षी योजने अंतर्गत ग्रामस्थांना गृहभेटीतुन शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहीत करणेत येत आहे. सदर योजना पुर्णपणे यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्नशिल आहोत.
    तसेच जिल्हयात सर्व शाळांमध्ये गुणवत्तापुर्ण शिक्षण व डिजीटल सुविधा पुरविण्याचे महत्वाकांक्षी लक्ष जिल्हा परिषदेनी घेतले आहे. आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे जिल्हयातील सर्व लोकांना गुणवत्तापुर्ण व तत्पर आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात e-governance खाली Paperless office, ISO प्रमाणीकरण, बायोमॅट्रीक उपस्थिती दत्यादी विषयांवर काम हाती घेण्यात आलेले आहे.
    जिल्हयाचा विकास हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यानेच होवु शकतो या करीता प्रशासनासोबत आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.
    जिल्हा सर्व क्षेत्रात पुढे येण्यासाठी करण्यात आलेल्या कामास व पुढे होणा-या सर्व कामास आपणा सर्वांना शुभेच्छा !



Mr.Mahendra B. Warbhuvan (I.A.S.)
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर.