शुभेच्छा! संदेश


     ठाणे जिल्हयाचे विभाजन होवून दिनांक १ ऑगष्ट २०१४ रोजी आपल्या नवनिर्मीत पालघर आदिवासी बहुल जिल्हयाची निर्मिती झाली.
      पालघर जिल्हयाची निर्मीती होवून दिनांक १ ऑगष्ट २०१४ रोजी दोन वर्षे पुर्ण होत आहेत. नवनिर्मीत पालघर जिल्हयाच्या विकासाचा दृष्टीकोन ठेवून जिल्हा परिषदेच्या कामकाजामध्ये पारदर्शकता राहण्यासाठी व कामामध्ये गतीमानता येण्यासाठी जिल्हा परिषद पालघरने स्वत:ची वेबसाईट तयार करुन आज दिनांक १ ऑगष्ट २०१४ रोजी पालघर जिल्हा परिषदेची Official Website व Official Facebook Account चे उद्धाटन होत असून ती खुली करण्यांत येत आहे ही आपणा सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. वेबसाईट मुळे जिल्हा परिषद पालघर मार्फत लोकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण होण्यासाठी व विविध विभागांमार्फत कामांचे व सदयस्थितीची माहीती व फोटो अपलोड करुन माहीती सर्वसामान्य जनतेस सहजपणे उपलब्ध होईल.
      पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हया असल्याने येथील समस्या सुद्धा मोठया प्रमाणात असून त्या सोडविण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाउल आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालघर जिल्हा २०१७ पर्यंत हगणदारी मुक्त करण्याचा निर्धार करण्यांत आलेला आहे. व कुपोषनाचे समुळ उच्चाटन करण्याचा उददेश आहे. तसेच सर्व शाळांमधून गुणवत्तापुर्ण शिक्षण घेण्यासाठी डिजीटल सुविधा पुरविण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष जिल्हा परिषदेने हाती घेतले आहे. तसेच आरोग्य सेवांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आय. एस. ओ. प्रमाणीकरण बाय मेट्रीक उपस्थिती इत्यादी कामे हाती घेण्यांत आली आहेत. जिल्हयाचा विकास हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने व समन्वयाने चांगल्या प्रकारे होवू शकतो. या बेवसाईट चा फायदा सर्वसामान्य जनतेस चांगल्या प्रकारे होईल यासाठी माझ्या वतीने मन:पुर्वक हार्दीक शुभेच्छा.




अध्यक्ष,
जिल्हा परिषद पालघर.