विभागाचे नाव | : बांधकाम विभाग,जिल्हा परिषद, पालघर | |
खाते प्रमुखाचे पदनाम | : कार्यकारी अभियंता | |
विभागाचा दुरध्वनी क्रमांक | : ०२५२०-२२२४२० जव्हार मुख्यालय : ०२५२५ -२५५४२० | |
विभागाचा ईमेल | : eetzpjawhar @ gmail.com |
योजना व माहिती
योजनेचे स्वरुप / माहीती :
रस्ते परिरक्षण व दुरुस्ती अंतर्गत शासनाकडून कार्यक्रम मंजूर होऊन जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्याची दुरुस्ती,खडीकरण डांबरीकरण नविन रस्ते घेतली जातात.
योजनेत सहभागाच्या अटी व शर्ती व पात्रता:
आवश्यकतेनुसार रस्त्यांच्या खडीकरणाची व डांबरीकरणाची तसेच त्यावरील पूल व मो-यांची कामे घेतली जातात.
जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना:
योजनेचे स्वरु/माहिती:
जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजने अंतर्गत शासनाकडून कामे अंर्थसंक्ल्पीत करुन मंजूर करण्यांत येतात.सदरच्या कामांना महाराष्ट्र शासन (आदिवासी विभाग) व जिल्हा नियोजन समिती यांचे कडून निधी प्राप्त होऊन आदिवासी क्षेत्रात व रस्त्यांच्या कामावर निधी खर्च केला जातो.
याजनेत सहभागाच्या अटी व शर्ती व पात्रता:
आदीवासी क्षेत्रातील रस्त्यांची खडीकरणाची तसेच त्यावरील पुल व मो-यांची कामे केली जातात.
जिल्हा वार्षिक बिगर आदिवासी योजना.
योजनेचे स्वरुप/माहिती:
लोकप्रतिनिधी यांनी सुचविलेली कामे जिल्हा नियोजन मंडळ यांचे कडे प्रस्तावीत केली जातात.
योजनेत सहभागाच्या अटी व शर्ती व पात्रता:
बिगर आदीवासी क्षेत्रातील रस्त्यांची खडीकरणाची व डांबरीकरणाची तसेच त्यावरील पुल व मो-याची कामे घेतली जातात.
आमदार/खासदार/डोंगरी विकास कार्यक्रम योजनेचे स्वरुप/माहीती :
आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम तसेच डोंगरी विकास कार्यक्रमा अंतर्गत मा.आमदार /खासदार व लोकप्रतिनिधीनी त्यांच्या मतदार संघात सुचविलेली कामे जिल्हा नियोजन विभागांमार्फत मंजुर होऊन रस्त,सामाजिक सभागृह,चावडी इमारती,रस्ते, शाळा,वॉल कंपाऊड इत्यादी कामे केली जातात
योजनेत सहभागाच्या अटी व शर्ती व पात्रता:
मा.आमदार/खासदार महोदयांची प्रस्तावित केलेली कामे आवश्यकतेनुसार केली जातात. पुरहानी दुरुस्ती कार्यक्रम
योजनेचे स्वरुप/माहीती:
सदरच्या योजनेअंतर्गत पावसाळयात अति पर्जन्य वृष्टीमुळे खराब झालेले रस्ते वाहतुकीस पुर्ववत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम व ग्रामविकास खात्या मार्फत मंजुरी दिली जाते.
योजनेत सहभागाच्या अटी व शर्ती व पात्रता:
पुरहानीमुळे ज्या रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे त्यास,प्राधान्य.
प्राधान्याने मो-या पेव्हड डीप,पुल दुरुस्ती,भराव दुरुस्तीची कामे.
सार्वजनिक आरोग्य
योजनेचे स्वरुप/माहीती:
सदरच्या योजनेअंतर्गत जिल्हा परिषद स्तरावर आरोग्य इमरती,प्राथमिक आरोग्य केंद्र,प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,वैदयकीय/कर्मचारी अधिकारी निवासस्थाने ईत्यादींची कामे व देखभाल दुरुस्तीची कामे घेतली जातात.
योजनेत सहभागाच्या अटी व शर्ती व पात्रता:
सदस्यचे काम तालुका आरोगय अधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा संमतीने सुचविने आवश्यक
४% शिक्षण सादील
योजनेचे स्वरुप/माहीती:
सदरच्या योजने अंतर्गत शिक्षण विभागाकडील ईमारतीची व देखभाल दरुस्तीची कामे घेतली जातात.
योजनेत सहभागाच्या अटी व शर्ती व पात्रता:
शिक्षण विभागाने निकडीनुसार सुचविलेली कामे