विभागाचे नाव | कृषी विभाग | |
खाते प्रमुखाचे पदनाम | कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद पालघर | |
विभागाचा दुरध्वनी क्रमांक | 02525/257722 | |
विभागाचा ईमेल | [email protected] |
आदिवासी उपयोजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) दारिद्रय रेषेखालील आदिवासी शेतकऱ्यांना तसेच अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याची योजना सन २०१६-१७ मध्ये या योजनांच्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणार असून सदर योजना अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या मागणी नुसार जमिन सुधारणा, निविष्ठा वाटप, सुधारीत अवजारे, बैलजोडी, बैलगाडी, जुनीविहीर दुरूस्ती, इनवेल बोअरींग, पाईपलाईन, पंपसंच, नविन विहीर, शेततळे, परसबाग, ठिबक/तुषार सिंचन, व इतर बाबींचा लाभ देय आहे.
2. गुणनियंत्रण कामकाज :-कृषि निविष्ठा (बियाणे, खते, किटकनाशके) यांना जिल्हयात विक्रीसाठी परवाना देणे. अधिक माहितीसाठी कृषि विभाग वेबसाईट www.mahaagri.gov.in वर निविष्ठा व गुणनियंत्रण विभागास भेट देणे.
3. बायोगॅस बांधणीकरीता अनुदान देणेराष्ट्रीय बायोगॅस विकास योजना अंतर्गत बायोगॅस उभारणी करीता केंद्र शासनाच्या अनुदान देण्यात येते. सर्वसाधारण गटासाठी - रू. 9,000/- प्रति संयत्र अनुसूचित जाती व जमाती - रु. 11,000/- प्रति संयत्र शौचालय जोडणी केल्यास - - रु. 1,200/- प्रति संयत्र. अधिक माहिती करीता जिल्हा स्तरावर - कृषी विकास अधिकारी व तालुका स्तरावर - गट विकास अधिकारी/ कृषी अधिकारी /विस्तार अधिकारी(कृषि) यांच्याकडे संपर्क साधावा.
4. जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत महत्वाच्या योजना.वरील सर्व जिल्हा परिषद सेस फंडा अंतर्गत असलेल्या योजनांन करीता पात्र लाभार्थी ठरवणेची जबाबदारी गटस्तरावरील कृषि विस्तार यंत्रणेची राहील. प्रथम येणा-या शेतक-यांना प्रथम प्राधान्य देणेत येईल. सदर योजना सर्वसाधारण व सर्व घटकातील शेतक-यांसाठी आहेत.