विभागाचे नाव | महिला व बालविकास विभाग | |
खाते प्रमुखाचे पदनाम | महिला व बाल विकास अधिकारी | |
विभागाचा दुरध्वनी क्रमांक | 02525 – 252692 | |
विभागाचा ईमेल | [email protected] |
महिला व बालविकास विभागामार्फ़त राबविण्यात येणा-या विविध योजना व उपक्रम-
योजना व माहिती
किशोरवयीन मुलींना जीवनकौशल्य जेंडर प्रशिक्षण देणे
योजनेचे स्वरुप / माहीती :
ग्रामीण व आदिवासी भागातील मुली यांनी घ्यावयाची काळजी, अल्पवयात विवाह केल्यास त्याचे होणारे दुष्परीणाम यांसाठी प्रबोधन शिबीरे घेऊन कुपोषण, अर्भकमृत्यु, मातामृत्यु रोखण्यास मदत होते
या वर्गामध्ये मुलींसाठी साधारणतः खालील बाबींचा समावेश असतो.
१) स्त्रियांच्या मासिक पाळीचे शास्त्र व उद्देश. समज व गैरसमज
२) मासिक पाळीच्या काळात आरोग्यविषयक घ्यावयाच्या काळजीची आवश्यकता.
३) गर्भधारणेचे शास्त्र, सर्वसाधारणपणे कुटुंबनियोजनाची साधने.
४) बालविवाहामुळे आरोग्यास होणारे दुष्परिणाम.
५) लैंगिक छळ, त्यापासुन स्वसंरक्षण कसे करावे, कोणाची मदत घ्यावी. अशा परिस्थीतीत हेल्पलाईनचा उपयोग करणे.
६) एडस नियंत्रण.
योजनेत सहभागाच्या अटी व शर्ती व पात्रता :
१) या योजनेअंतर्गत सर्व सामाजिक प्रवर्गातील किशोरवयीन मुलींना सामावुन घेता येते.
२) या प्रशिक्षण वर्गात लैंगिक व विशिष्ट किशोरवयीन समस्यांबद्दल शिक्षण देण्यात येत.
३) या प्रशिक्षण वर्गासाठी महिला व बाल विकास समिती निश्चित करेल त्या स्वयंसेवी संस्थामार्फत/अंगणवाडी पर्यवेक्षिकामार्फत प्रशिक्षण देण्यात येते.
४) प्रशिक्षण वर्गात 40/50 मुलींचा सहभागअसतो.
५) शाळेत/महाविद्यालयात शिकणार्या मुलीं आणि गळती झालेल्या मुलींसाठी या प्रशिक्षणवर्गाचे आयोजन करण्यात येते.
७) प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन करणेकामी बाहेरील तज्ज्ञांना व डॉक्टरांना, मनोवैज्ञानिकांना निमंत्रित करण्यात येते.
8) ) प्रशिक्षण वर्गास प्रत्येकी 400/- रु.मानधन देणेत येते.
आदर्श अंगणवाडी / बालवाडी सेविकांना पुरस्कार
योजनेचे स्वरुप / माहीती :
अंगणवाडी सेविका यांना उत्कृष्ट कामकाजाबद्दल पारितोषिक देवुन त्यांचा सन्मान करणे. यामुळे अंगणवाडी सेविका यांना त्यांचे कामकाजात भरीव कामगीरी करण्यास प्रोत्साहन मिळते व त्याद्वारे योजनेचे काम जास्तीत जास्त प्रभावीपणे राबविण्यास मदत होते.
योजनेत सहभागाच्या अटी व शर्ती व पात्रता :
१) अंगणवाडी केंद्रातील मध्यम व तिव्र कुपोषित च्या बालकांची संख्या सर्वात कमी ठेवण्यात यश प्राप्त केलेल्या सेविका यांना या योजनेत सहभाग नोंदवितात.
2) संस्थात्मक प्रसुती, अर्धवार्षिक वाढदिवस, गरोदर नोंदणीचे प्रमाण, बालविवाह, बालमृत्यु व अर्भकमृत्यु या कामात १००% यश प्राप्त केलेल्या सेविका लाभास पात्र राहतात.
3) प्रत्येक प्रकल्पातुन तीन अंगणवाडी सेविका यांची माहिती जि.प. कडे सादर करण्यात येते.
4) जि.प.स्तरावर नियुक्त समिती पैकी एका अंगणवाडी सेविकेची निवड करतात.
5) पात्र अंगणवाडी सेविकेचा २०००/- चे किसान विकास पत्र प्रशस्तीपत्रक, शाल व श्रीफळ देऊन यथोचित गौरव करण्यात येतो
6) सदरचा कार्यक्रमासाठी नाटयमंदिर किवा प्रशस्त हॉल घेणेत येतो.
मुलींना स्वसंरक्षणासाठी व त्यांच्या शारिरिक विकासासाठी प्रशिक्षण योजना
योजनेचे स्वरुप / माहीती :
महिला व मुलींना स्वसंरक्षणासाठी सक्षम करणे.
योजनेत सहभागाच्या अटी व शर्ती व पात्रता :
१) किशोरवयीन मुलींना या योजनेचा लाभ दिला जातो. मुलींना सशुल्क लाभ दिला जातो.
२) जि.प.सेस निधीतुन दिल्या जाणारा लाभ जाती भेद न करता दिला जातो.
३) योजनेंतर्गत कराटे प्रशिक्षण देण्यात येते याबाबत महिला व बाल विकास समिती प्रशिक्षण निश्चित करते.
4) प्रशिक्षणाचा कालावधी किमान तिन महिन्याचा असतो
5) एक बॅच सर्वसाधारणपणे 40 मुलींची असते
6) प्रशिक्षकांस प्रति लाभार्थी रु 6००/- प्रतिमहा पर्यंत मानधन देण्यात येते
7) संस्थेचे प्रशिक्षक हे शासनमान्य संस्थेचे ब्लॅक बेल्ट प्रमाणपत्र धारक असतात
8) सदरचे प्रशिक्षण शाळा, आश्रमशाळा, व महाविद्यालये यांच्या समन्वयाने आयोजीत करण्यात येते.
9) सदर प्रशिक्षणवर्ग सुरु करतांना तसेच त्याचा समारोप करतांना मा. जि.प. सदस्य, पं.स. सदस्य व इतर लोकप्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात येते
१० वी व १२ वी पास मुलीना संगणक प्रशिक्षण देणे
योजनेचे स्वरुप / माहीती :
दहावी व बारावी पास मुलींना संगणकाचे ज्ञान प्राप्त व्हावे हा योजनेचा उद्देश आहे.
योजनेत सहभागाच्या अटी व शर्ती व पात्रता :
१) सदर योजनेचा लाभ लाभार्थींनी गेल्या १० वर्षात अन्य कोणत्याही विभागाकडून घेतला नसल्याबाबत ग्रामसेवकाचा दाखला.
२) आदिवासी उपयोजना निधीतुन दिल्या जाणार्या लाभासाठी आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अनु.जमाती व विशेष घटक योजने मधुन अनु. जातीच्या लाभार्थीचींच निवड केली जावी. बिगर आदिवासी व जि.प.सेस निधीतुन दिल्या जाणारा लाभ जाती भेद न करता दिला जातो.
३) लाभार्थी मुलगी ही अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे कुटूंबीयापैकी तसेच शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी /अधिकारी यांचे कुटुंबातील नसावी. तसा सरपंच / ग्रामसेवक यांचा दाखला आवश्यक असतो.
4) उमेदवार दहावी किवा बारावी उत्तीर्ण असावी.
5) उमेदवारास सदर प्रशिक्षणासाठी प्रति लाभार्थी र.रु.3050/- इतके अनुदान देय आहे.
6) लाभार्थींची निवड ही बाल विकास प्रकल्पाधिकारी यांनी करुन त्यांची यादी संबंधित संस्थेकडे व जिल्हा कार्यालयास सादर करणेत येते.
कुपोषित मुलामुलींसाठी तसेच गरोदर महिला व स्तनदा मातांसाठी अतिरिक्त आहार
पालघर जिल्हयातंर्गत तलासरी, जव्हार, जव्हार 2, विक्रमगड, मोखाडा, डहाणु, कासा, वाडा, वाडा-2, पालघर, मनोर, वसई, वसई -2 या 13 प्रकल्पाकरीता 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील कुपोषित (मध्यम व तीव्र कमी वजनाची मुले) श्रेणीतील मुलांसाठी अंडी/केळी (दोन केळीसाठी अथवा 1 कोंबडीचे (उकडलेले) यासाठी आदिवासी उपयोजना (TSP 2235-2297) मधील एकुण रक्कम रु.80.00 लक्ष च्या निधीचे वाटप खालील प्रमाणे करणेत आलेले आहे. सदर योजनेमुळे जिल्ह्यातील कुपोषणामध्ये घट होणे अपेक्षीत असून सदर योजनेकरीता सन 2016-17 करीता अजून रु. 01 कोटी 50 लक्ष ची मागणी आदिवासी उपयोजने मधून करणेत आली आहे. या योजने मुळे अंगणवाडीत उपस्थित राहणा-या मुलांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे
योजनेचे स्वरुप / माहीती :
महिलांना त्यांच्या कौटुंबिक, कायदेविषयक, सामाजिक समस्या सोडविण्यासाठी मदत तसेच कायदेविषयक मार्गदर्शन केले जाईल. तसेच योग्य त्या प्रकरणांमध्ये समुपदेशनही आयोजित केले जाईल. (उदा. हुडांबळी प्रकरण, विभक्त कुटूंबाच्या समस्या, घरगुती अत्याचार, घरातुन बाहेर काढण्याची धमकी देणे, मारहाण करणे, रात्री-अपरात्री घरातुन बाहेर काढणे, घटस्फोटासाठी दबाव आणणे, घटस्फोट व पोटगी प्रकरण, मालमत्ता हक्क, लैगिक छळवणुक इ.) या समुपदेंशन केंद्राद्वारे महिलांना त्यांच्या कौटुंबिक, सामाजिक समस्या सोडविण्यासाठी मदत व कायदेविषयक मार्गदर्शन केले जाईल तसेच योग्य त्या प्रकरणांमध्ये समुपदेशनही आयोजित केले जाईल. उदा. हुडांबळी प्रकरण, विभक्त कुटूंबाच्या समस्या, घरगुती अत्याचार, घरातुन बाहेर काढण्याची धमकी देणे, मारहाण करणे, रात्री-अपरात्री घरातुन बाहेर काढणे, घटस्फोटासाठी दबाव आणणे, घटस्फोट व पोटगी प्रकरण, मालमत्ता हक्क, लैगिक छळवणुक इ. मानसिकदृष्टया असंतुलीत महिलांचे सामाजिक मानसशास्त्रीय कायदेशिर समुपदेशनही यात अंतर्भुत राहील.
महिला व बालविकास विभागामार्फ़त सन 2015-16 मध्ये राबविण्यात आलेल्या विविध योजना
1) शाळेत जाणा-या मुलींना दोनचाकी सायकल पुरविणे - सदर योजनेचा उद्देश शाळेत जाणा-या आर्थीकदृष्टया कमकुवत असलेल्या कुटूंबातील मुलीना वेळेवर शाळेत पाहोचता यावे त्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळावा शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे.व त्याच्या शिक्षणात खंड पडू नये असा आहे. दुर्गम भागातील शाळेपासुन जास्त अंतरावरील तथापी शाळा ते घराचे अंतर कमीत कमी 2 कि.मी.असाणा-या मुलींना प्रथम लाभ देणेत आला आहे. विभागा मार्फ़त एकुण 526 संच सायकल पुरविणेत आल्या आहेत. जि.प. निधी – 20 लक्ष
अ.क्र | प्रकल्पाचे नाव | एकुण नग |
1. | तलासरी | 52 |
2. | जव्हार | 43 |
3. | जव्हार-2 | 31 |
4. | विक्रमगड | 21 |
5. | मोखाडा | 48 |
6. | डहाणू | 63 |
7. | कासा | 30 |
8. | वाडा | 46 |
9. | वाडा-2 | 41 |
10. | पालघर | 64 |
11. | मनोर | 16 |
12. | वसई | 29 |
13. | वसई-2 | 42 |
एकुण | 526 |
2) अपंग कल्याण योजनेअंतर्गत महिला घरघंटी पुरविणे व अनुसुचित जातीच्या महिलांना घरघंटी पुरविणे - सदर योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील दारिद्ररेषेखालील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे आहे. ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील अपंग महिला लाभार्थ्याना लाभ देण्यात आला आहे. विभागा मार्फ़त सन 2015-16 मध्ये 2) एकुण अपंग महिलांना 85 व अ.जा. महिलांना 60 अशा एकुण 137 संच घरघंटी पुरविणेत आल्या आहेत. जि.प. निधी - 20.00 लक्ष व विशेष घटक योजना निधी - 11.00 लक्ष
अ.क्र | प्रकल्पाचे नाव | 3% अपंग कल्याण घरघंटी नग | अ.जा. महिला घरघंटी नग | एकुण नग |
1. | तलासरी | 0 | 0 | 0 |
2. | जव्हार | 0 | 5 | 5 |
3. | जव्हार-2 | 1 | 0 | 0 |
4. | विक्रमगड | 1 | 0 | 1 |
5. | मोखाडा | 13 | 0 | 13 |
6. | डहाणू | 7 | 5 | 12 |
7. | कासा | 5 | 0 | 5 |
8. | वाडा | 3 | 2 | 4 |
9. | वाडा-2 | 7 | 14 | 18 |
9. | वाडा-2 | 7 | 14 | 18 |
10. | पालघर | 31 | 14 | 42 |
11. | मनोर | 8 | 6 | 14 |
12. | वसई | 6 | 9 | 15 |
13. | वसई-2 | 3 | 5 | 8 |
एकुण | 85 | 60 | 137 |
3) महिलांना साहित्य पुरविणे अंतर्गत महिलांना शिलाई मशिन पुरविणे- सदर योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील दारिद्ररेषेखालील महिलांना स्वयंरोजगारा उपलब्ध करुन देणे आहे. ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील महिला लाभार्थ्याना लाभ देण्यात आला आहे. योजने करीता शिलाई मशिन प्रशिक्षणाचा आवश्यक कोर्स केला आहे, त्या महिलांना लाभ देणेत आला आहे. विभागा मार्फ़त सन 2015-16 मध्ये एकुण 178 नग शिलाई मशिन पुरविण्यात आल्या आहेत. जि.प. निधी 15.94 लक्ष
अ.क्र | प्रकल्पाचे नाव | एकुण नग |
1. | तलासरी | 15 |
2. | जव्हार | 19 |
3. | जव्हार-2 | 10 |
4. | विक्रमगड | 6 |
5. | मोखाडा | 25 |
6. | डहाणू | 13 |
7. | कासा | 12 |
8. | वाडा | 28 |
9. | वाडा-2 | 28 |
10. | पालघर | 8 |
11. | मनोर | 7 |
12. | वसई | 0 |
13. | वसई-2 | 7 |
एकुण | 178 |
4) किशेारवयीन मुलींना व महिलांना जीवन कौशल्यांचे प्रशिक्षण देणे – सदर योजनेचा उद्देश किशोरवयीन मुलींना शाळेत सर्वसाधारण शिक्षण देणे आहे. लैगिंक व विशिष्ट समस्याबद्दल शिक्षण देण्यांत येत नाही त्यामुळे मुलामुलींना मानसिक व सामाजिक मनोवैज्ञानिक अडचणींना तोंड द्यावे लागते. तेव्हा मुलींना प्रशिक्षण देवुन त्यांना मानसिक,शारिरिक भावनिक आधार देणेसाठी प्रशिक्षण देणेत येते. शाळा /महाविद्यालयांत शिकणारी किशोरवयीन मुली यांना हे प्रशिक्षण देण्यांत येते. विभागा मार्फ़त सन 2015-16 मध्ये एकुण 1250 प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले. जि.प. निधी. 5.0 लक्ष
अ.क्र | प्रकल्पाचे नाव | एकुण नग |
1. | तलासरी | 75 |
2 | जव्हार | 100 |
3 | जव्हार-2 | 100 |
4 | विक्रमगड | 100 |
5 | मोखाडा | 100 |
6 | डहाणू | 105 |
7 | कासा | 105 |
8 | वाडा 1 | 100 |
9 | वाडा-2 | 105 |
10 | पालघर | 105 |
11 | मनोर | 105 |
12 | वसई 1 | 75 |
13 | वसई-2 | 75 |
एकुण | 1250 |
5) स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिर - सदर योजनेचा उद्देश ग्रामीण व आदिवासी भागातील मुलींना विविध स्पर्धा परिक्षांबाबत माहिती देणे, मार्गदर्शन करणे आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये स्पर्धा परिक्षांकडे ओढ़ा वाढलेला आहे. विभागा मार्फ़त सन 2015-16 मध्ये एकुण 40 प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले. जि.प. निधी. 3.20 लक्ष
अ.क्र | प्रकल्पाचे नाव | एकुण नग |
1 | तलासरी | 2 |
2 | जव्हार | 2 |
3 | जव्हार-2 | 1 |
4 | विक्रमगड | 2 |
5 | मोखाडा | 2 |
6 | डहाणू | 8 |
7 | कासा | 2 |
8 | वाडा 1 | 4 |
9 | वाडा-2 | 6 |
10 | पालघर | 5 |
11 | मनोर | 2 |
12 | वसई 1 | 2 |
13 | वसई-2 | 2 |
एकुण | 40 |
6) महिलांना कायदेविषयक सल्ला देणे - सदर योजनेचा उद्देश ग्रामीण व आदिवासी भागातील महिला व मुलींना कायदेविषयक / विधीविषयक सल्ला देणे आहे. यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांमध्ये त्यांचे अधिकार, कायदे याविषयी जागृती होत आहे. विभागा मार्फ़त सन 2015-16 मध्ये एकुण 22 प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले. जि.प. निधी. 55000/- मात्र
अ.क्र | प्रकल्पाचे नाव | एकुण नग |
1 | तलासरी | 1 |
2 | जव्हार | 2 |
3 | जव्हार-2 | 2 |
4 | विक्रमगड | 2 |
5 | मोखाडा | 2 |
6 | डहाणू | 2 |
7 | कासा | 2 |
8 | वाडा 1 | 2 |
9 | वाडा-2 | 2 |
10 | पालघर | 2 |
11 | मनोर | 2 |
12 | वसई 1 | 1 |
13 | वसई-2 | 1 |
एकुण | 22 |
भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दूल कलाम अमृत आहार योजना
अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक (Calories) व प्रथिनाच्या (Proteins) कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त असून आदिवासी समाजामध्ये याचे प्रमाण 33.1 टक्के एवढे आहे.आदविासी स्त्रियांमध्ये गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजन वाढीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा परिणाम बाळाच्या वजनावर होऊन कमी वजनाची बालके जन्माला येतात,असे अनके संशोधन अभ्यासावरून सिध्द झाले आहे.या पार्श्वभूमिच्या अनुषंगाने अनुसूचित क्षेत्रातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्याची योजना मंजूर करण्यात आलेली आहे.सदरची योजना पालघर जिल्हयातील जव्हार,जव्हार-2,मोखाडा ,वाडा,वाडा-2,विक्रमगड,डहाणू,कासा व तलासरी पुर्ण प्रकल्पात व पालघर , मनोर,वसई-2 या पेसाअंतर्गत येणा-या गावांत मंजूरी दिलेली आहे.