विभागाचे नाव | म.गां.रा.रो.ह. योजना विभाग | |
खाते प्रमुखाचे पदनाम | उपमुख्य कार्यकारी अधिकारी (रोहयो) तथा उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक | |
विभागाचा दुरध्वनी क्रमांक | ०२५२५-२५०८०० | |
विभागाचा ईमेल | [email protected] |
ग्रामीण भागात राहणा-या व अंगमेहनतीची अकुशल कामे करणा-या मजूरांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्यात रोजगार हमी योजना व केंद्राची ग्रामीण रोजगार हमी योजना यांची सांगड घालून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आमलात आणली आहे.पालघर जिल्हयात (पूर्वीच्या ठाणे जिल्हयात) १ एप्रिल २००७ पासून सुरु आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र या योजनेत संपूर्ण ग्रामीण व्यवस्थेचा कायापालट करण्याची क्षमता आहे. ही योजना अधिक प्रभाविपणे राबविण्यासाठी राज्य शासनाने अलीकडील काळात काही महत्चपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. योजनेची अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावरुन प्रभावशाली होणे आवश्यक असून त्याची माहिती नागरीकांपासून सरपंच, ग्रामसेवक, कार्यान्वयीन यंत्रणा ते जिल्हा स्तरापर्यंत तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रसार माध्यमे, ग्रामपचांयत सदस्य तसेच सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचावी आणि सर्व घटकांचा योजनेच्या अंमलबजावणीत सहभाग मिळावा. त्यानुषंगाने पालघर जिल्हयातील आदिवासी दुर्गम तालुक्यात महात्मा गांधी नरेगा अंतर्गत आदिवासी बांधवांना वैयक्तिक लाभाची कामे, जलसंधारण व जलसंवर्धनाची कामे, कृषीची कामे,वनसंवर्धनाची कामे व ग्रामपंचायतीची कामे संबंधित विभागाच्या इतर योजनांशी सांगड(Convergence ) करुन व आदिवासी बांधवांना पुरक व्यवसाय करण्यास प्रवृत्त करुन आदिवासी बांधवांचे जिवनमान उंचावणे हा योजनेचा महत्वाचा उद्देश आहे. मजूरांचे स्थलांतर रोखण्यास व त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास महात्मा गांधी नरेगा ही एक चांगली योजना आहे. टँकरग्रस्त भागातील, डोगराळ व दुर्गम भागातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी मोठया प्रमाणावर सिंचन विहीर तसेच पाणीसाठा वाढविण्यासाठी वनराई बंधारे, दगडी नालाबांध,गॅबीयन बंधारे, गावतलाव,वनतळे यासारख्या कामाचे नियोजन केले आहे.
सार्वजनिक हिताची कामे | |
वनविभाग | वनिकरण व कुरणाविकास, सलग समतल चर, वनतळी, वनबंधारे, वृक्षलागवड, गुरेप्रतिबंधक चर. |
सामाजिक वनीकरण | सलग समतल चर,वृक्षलागवड/वनशेती,कुरणविकास. |
पाटबंधारे विभाग | धरण,तलाव,कालवे,भुमीगत बंधारे,जलाशयातील गाळ काढणे, कालव्यांचे नुतनीकरण. |
सार्वजनिक बांधकाम विभाग | रस्ते, जोडरस्ते, रस्त्यांचे मजबुतीकरण/नूतनीकरण, रस्त्यांचे रुंदीकरण इ. |
पाणीपुरवठा विभाग | शोषखड्डा, पुनर्भरण खड्डा |
मत्सव्यवसाय विभाग | मत्स्यपालन, मासे सुकविण्यासाठी काँक्रींटचा ओटा बांधणे |
भूजल सर्वेक्षण यंत्रणा | भूमिगत बंधारे |
खाजगी जमिनीवर व वैयक्तिक लाभाची कामे | |
कृषि विभाग | १. भूसुधारणेची कामे: सलग समतल चर,पडीक जमिनीवर वनीकरण,मजगी,जुनी भात शेती दुरुस्ती, बांधावरील वृक्ष लागवड,फळबाग लागवड. २.जलसंवर्धन कामे : दगडीबांध, शेततळे, माती नालाबांध, वनराई बंधारे, गॅबीयन बंधारे. |
नविन वैयक्तिक लाभाची कामे | |
कृषि विभाग | |
कृषि विभाग | नाडेप खत निर्मितीसाठी खड्डा,गांडूळखत निर्मितीसाठी खड्डा, संजीवक/ अमृत पाण्यासाठी खड्डा, सिंचन विहिरी. |
पशुसंवर्धन विभाग | कुक्कुटपालनासाठी शेड, शेळयांसाठी शेड, जनावरांचा गोठा , अझोलासाठी खड्डा. |
पाणीपुरवठा विभाग | शोषखड्डा, पुनर्भरण खड्डा. |
अ.क् | अनुज्ञेय कामांचे नाव | कार्यान्वयीन यंत्रणा |
१ | २ | ३ |
१. जलसंधारण व जलसंवर्धन कामे | ||
माती नाला बांध | कृषी विभाग | |
ढाळीचे बांध | कृषी विभाग | |
गॅबियन बंधारा | कृषी विभाग | |
वनराई बंधारा | ग्रामपंचायत/कृषी विभाग/वन विभग | |
सलग समतल चर | कृषी विभाग/वन विभाग | |
ट्रेंच कम माऊंट | वन विभाग | |
२. जलसिंचनांची कामे | ||
तलाव व कालव्यांतील गाळ काढणे/ सफाई, अस्तरीकरण व नुतनीकरण, मातीचे कालवे, नदी- नाल्यांचे पुनरुज्जीवन |
ग्रामपंचायत / पाटबंधारे विभाग | |
३. दुष्काळ प्रतिबंधक कामे ( वनीकरण व वृक्ष लागवडीसह) | ||
पडिक (गायरान) जमिनीवर वृक्ष लागवड व वैरण विकास योजना,रोपवाटीका, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन | सामाजिक वनिकरण/कृषी विभग/वन विभाग/ग्रामपंचायत यंत्रणा | |
४. रस्ते | ||
गावातील बारमाही रस्ते, जोडरस्ते स्माशानभूमी/पाणी पुरवठा विहिरीकडे जाणारे सिमेंट कॉक्रीट रस्ते/पेवर ब्लॉक्स वापरुन केलेले रस्ते | ग्रामपंचायत यंत्रणा/सार्वजनिक बांधकाम विभाग | |
५. वैयक्तिक लाभाची कामे | ||
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र रेषेखालील, भूसुधार योजनेतील इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी वन अधिकारी अधिनियमानुसार प्राप्त वन निवासी यांकरिता मजगी | कृषी विभाग | |
सिंचन विहिरी | ग्रामपंचायत यंत्रणा | |
शेततळी/गावतळे/वनतळे | ग्रामपंचायत यंत्रणा/कृषी विभाग/वनविभाग | |
फळबाग लागवड,भूसुधारणा इ. वैयक्तिक लाभाची कामे | ग्रामपंचायत यंत्रणा/कृषी विभाग | |
६. राजीव गांधी सेवा केंद्र/ भवन | ||
राजीव गांधी सेवा केंद्र/ भवन | जिल्हा परिषद बांधकाम विभाग | |
सार्वजनिक बांधकाम विभाग | ||
७. कृषी विषयक कामे | ||
एन.ए.डी.इ.पी. कम्पोस्ट पिट | कृषी विभाग/ ग्रामंपचायत विभाग | |
गांडूळ खते तयार करणे (Vermi Composting ) | कृषी विभाग/ ग्रामंपचायत विभाग | |
जैविक खते (Liquid Bio-Manures ) | कृषी विभाग/ ग्रामंपचायत विभाग | |
८. पशुधन विषयक कामे | ||
१)कुक्कुट पालनसाठी शेड | जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद पालघर (ग्रामपंचायत) | |
२) शेळयाबक-यांसाठी शेड | जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद पालघर (ग्रामपंचायत) | |
३) कोबा करणे (Construction of Pucca floor) चारा साठवण्याची व्यवस्था | जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद पालघर (ग्रामपंचायत) | |
९. मत्स्यव्यवसाय विषयक कामे | ||
सार्वजनिक जमिनीवर हंगामी साचणा-या पाण्यातील मत्स्यव्यवसाय | ग्रामपंचायत | |
१०. समुद्रकिनारी भागातील कामे | ||
समुद्र किना-यावर मासे सुकविण्यासाठी क्षेत्र (Fish Drying Yards ) उपलब्ध करुन देणे | ग्रामपंचायत | |
११. ग्रामीण क्षेत्रातील पिण्याच्या पाण्यासंबंधीची कामे | ||
शोष खड्डा/पिण्याच्या पाण्यासाठी खड्डे (Soak Pits ) | पाणी पुरवठा विभाग (ग्रामंपचायत) | |
पुनर्भरण खड्डे (Recharge Pits ) | पाणी पुरवठा विभाग (ग्रामंपचायत) | |
१२. ग्रामीण स्वच्छतेची कामे | ||
वैयक्तिक शौचालये, शाळेकरिता शौचालय, अंगणवाडी शौचालये, शोष खड्डे, उघडी गटारे, घनकचरा व्यवस्थापन | ग्रामपंचायत |
वरील कामांचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी व तालुका स्तरावर तहसिलदार/ गट विकास अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र योजनेशी संबंधित अधिक माहिती मिळविण्यासाठी www.nrega.nic.in या वेब साईट ला भेट दया.