विभागाचे कार्य व उपक्रम.
मागासवर्गीयांचे सामजिक व शैक्षणिक जीवनमान उंचावणे व त्यांच्या उन्नतीसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत वेगवेगळया योजना व उपक्रमाव्दारे कामकाज करणेत येते. तसेच शासनाच्या धोरणात्मक आदेशानुसार जिल्हा परिषदांनी त्यांच्या उत्पन्नाच्या किमान २० % निधी मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करणेसाठी व 3% निधी अपंगांसाठी कल्याणकारी योजनांवर खर्च करणेसाठी योजनांची अंमलबजावाणी व नियंत्रणाचे कार्य जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन जिल्हा समाजकल्याण विभाग व मा. समाज कल्याण समिती करते. शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना,शासन निर्णय व परिपत्रकान्वये प्राप्त निधीमधुन खालीलप्रमाणे योजना राबविणेत येतात.
वैयक्तीक योजना
वैयक्तीक लाभाच्या सर्व योजनांकरीता खालील निकष सारखे असुन त्याव्यतीरिक्त आवश्यक अटी रकाना क्र.३ मध्ये नमुद आहेत.
1. लाभार्थी अनुसूचीत जाती,जमाती /विमुक्त जाती व भटक्या जमाती या संवर्गातील असावा.
2. वार्षीक उत्पन्नाची मर्यादा रु. २०,०००/ व अपंगाचे बाबतील रु. ४०,०००/ मर्यादेपर्यंत असुन उत्पन्नाचा दाखला संबंधीत तलाठी व ग्रामसेवकाचा आवश्यक
3. दारिद्रय.रेषेखालील यादीत कुटुंबीयाचे नाव असलेल्या लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
4. लाभार्थ्यांच्या कुंटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकिय अथवा निमशासकिय सेवेत नसावी.
5. योजनेचा लाभ लाभार्थ्यांस एकाच वेळी दुबार मिळणार नाही.
6. शा. नि. क्रं. मागास/१०९८/प्रक्र.७३/३४ दि. २०/१०/१९९९ नुसार नमूद केलेल्या अटी व शर्ती लाभार्थीवर बंधनकारक राहतील.
अ.क्र. | योजनांचे नांव | पात्रतेबाबतचे निकष |
१ | अनुदानित वसतीगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दप्तर ,रेनकोट, छत्री व स्वेटर पुरविणे विद्यार्थ्यी/विद्यार्थिनींचा प्रवेश अनुदानित वसतीगृहात नियमीत असावा व शाळेत शिकत असावा. सदरचा लाभ इ. 5 वी ते 9 पर्यतच्या मुला-मुलींना देय आहे. | वसतीगृह अधिक्षकांकडून लाभार्थी विद्यार्थ्याची यादी प्राप्त करण्यात येइल. |
२ | मागासवर्गीयांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे (एकवेळ) | १)विद्यार्थी शिक्षण घेत असावा. किमान 12 वी पास व त्यापुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असावा. २) लाभार्थ्यांने यापुर्वी लाभ घेतला नसावा.इ. 12 वी ते पदवीधर पर्यंत शिक्षणास आर्थिक सहाय्य मिळणेच्या उददेशाने योजना कार्यान्वीत |
३ | मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संगणकMSCIT प्रशिक्षण देणे | १) लाभार्थी इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा. २) संगणक प्रशिक्षण ज्या वर्षात घेतले त्याच वर्षात फी देय राहिल. . |
४ | मागासवर्गीय लाभार्थ्यांना नवीन घरबांधणी अथवा घरदुरुस्तीसाठी अर्थसहाय्य | १) लाभार्थी निवड ग्रामसभेत करण्यात यावी. २)लाभार्थ्यांचे नांवे घर असावे ३) सदर योजनेतंर्गत प्रती लाभार्थी रु. ४००००/- अनुदान मर्यादा राहिल. |
५ | मागासवर्गीय गरोदर महिलांना शासकिय संस्थेत बाळंत झाल्यास त्यांना मच्छरदाणी व अनुषंगिक साधने पुरविणे | १)गरोदर महिलांची नोंद शासकिय संस्थेत केलेली असावी २)संस्था नोंदणीकृत व शासनमान्य असणे आवश्यक |
६ | मागासवर्गीय लाभार्थ्यास बॅन्जो संच पुरविणे. | १) सदरचा लाभ एका गावातील कमीत कमी ११लाभार्थीच्या सामुहिक गटास देण्यात येईल. २) लाभार्थ्यांच्या कुंटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकिय अथवा निमशासकिय सेवेत नसावी. ३) योजनेचा लाभ सदर गटास/पथकास देण्यात आलेला नसल्याबाबत ग्रा.पं. चा दाखला घेणे आवश्यक आहे गटास/पथकास एकाच वेळी दुबार लाभ मिळणार नाही. ४) बॅन्जो गट/पथकाची निवड ग्रामसभेत करण्यात यावी. ५) सदर गटास/पथकास दिलेल्या साहित्याचा दुरुपयोग केला जाणार नाही याबाबत दुरुपयोग झाल्यास रक्कम गटातील/पथकातील सर्व लाभार्थींची स्टॅम्पपेपरवर एकत्रित प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे. ६) गटातील/पथकातील लाभार्थी बॅन्जो वाजविण्याचे काम करीत असलेबाबत ग्रामसेवक यांचा दाखला घेणे आवश्यक आहे. ७) एका कुंटुंबातील एकाच लाभार्थीस पथकात घेणे आवश्यक आहे. ८) साहित्य देखभाल दुरुस्ती संबंधीत पथकाने/गटाने वैयक्तिकरित्या करावी. ९) पथकातील /गटातील लाभार्थींनी बॅन्जो साहित्य विकल्यास भाडयाने दिल्यास साहित्याच्या किंमती एवढी रक्कम एक रकमी वसूल करण्यात येईल. |
७ | मागासवर्गीय लाभार्थ्यांना घरघंटी पुरविणे | १) लाभार्थींस वस्तूस्वरुपात लाभ देण्यात येईल. २) लाभार्थीकडून लाभाचा दुरुपयोग होणार नाही असा करारनामा रु.१००/- चे स्टॅम्पपेपरवर करुन घेणेत येईल. ३) घरघंटी व्यवसायासाठी स्वतःच्या मालकीची जागा असल्यास त्याबाबत जागेचा उतारा ग्रा.पं ८ क जोडावा. ४) विजेची सोय असल्याबाबतचा पुरावा देण्यात यावा. ५) घरघंटी गॅरंटी कालावधीनंतर नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती लाभार्थीने स्वतः करावी. |
८ | मागासवर्गीय लाभार्थ्यांना पापड मशिन पुरविणे | १) लाभार्थींस वस्तूस्वरुपात लाभ देण्यात येईल. २) लाभार्थीकडून लाभाचा दुरुपयोग होणार नाही असा करारनामा रु.१००/- चे स्टॅम्पपेपरवर करुन घेणेत येईल. ३) पापड मशिन व्यवसायासाठी स्वतःच्या मालकीची जागा असल्यास त्याबाबत जागेचा उतारा ग्रा.पं ८ क जोडावा. ४) विजेची सोय असल्याबाबतचा पुरावा देण्यात यावा. ५) पापड मशिन गॅरंटी कालावधीनंतर नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती लाभार्थीने स्वतः करावी. |
९ | मागासवर्गीय लाभार्थ्यांना शिलाई मशिन पुरविणे | १) लाभार्थींस वस्तूस्वरुपात लाभ देण्यात येईल. २) लाभार्थीकडून लाभाचा दुरुपयोग होणार नाही असा करारनामा रु.१००/- चे स्टॅम्पपेपरवर करुन घेणेत येईल. ३) लाभार्थी इ. 4 थी पास असावा ४)लाभार्थ्याचे शिवणकामाचे प्रशिक्षण केल्याचे शासनमान्य संस्थेचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ५) साहित्य पुरविल्यानंतर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी लाभार्थ्यांची राहील. |
१० | इ. ५ वी ते ९ वीच्या मागसवगी्रय विद्यार्थ्यांना सायकली पुरविणे | १)इ. ५ वी प्रवेश घेतलेल्या तसेच इ. ८ वीत प्रवेश घेतलेला असावा. २)लाभार्थ्यांचे घर ते शाळेतील अंतर कमीत कमी २ कि.मी असावे. ३)लाभार्थीकडून लाभाचा दुरुपयोग होणार नाही असा करारनामा रु.१००/- चे स्टॅम्पपेपरवर करुन घेणेत येईल |
अ.क्र. | योजनांचे नाव | पात्रतेबाबतचे निकष |
१ | मागासवर्गीय वस्तीत जोडरस्ते बांधणे | १) योजनेची प्रसिध्दी पंचायत समित्यांनी ग्रामस्तरावर सर्वदुर करावी. २) योजनेचा लाभ यापूर्वी एकादाही मिळालेला नाही अशा मागासवर्गीय वस्त्यांना प्राधान्य देण्याची दक्षता घ्यावी. ३) प्रस्ताव ग्रामसभेकडून शिफारस होऊन संबधित गट विकास अधिकारी यांचे मार्फत समाज कल्याण विभागास विहित प्रपत्रात प्राप्त झालेनंतर समाज कल्याण समिती मध्ये मान्यता देण्यात येईल ४) सदरची योजना मागासवर्गीय वस्ती मध्ये राबविण्यात यावी |
२ | मागासवर्गीय वस्तीमधील समाज मंदिरामध्ये भांडी,खुर्चा,सतरंजी पुरविणे, | १) या योजनेतंर्गत पूर्वी लाभ दिलेला नसावा. २) मागासवर्गीय वस्तीमध्ये समाज मंदिर बांधून इमारत सुसज्ज असणे आवश्यक आहे. ३) योजनेची निवड ग्रामसभेत करण्यात यावी.. |
३ | दलितवस्ती सुधारणा अंतर्गत बांधलेल्या समाज मंदिरांची अपुर्ण कामे पुर्ण करणे व समाज मंदिर पाणी पुरवठयासह दोन शौचालय,दोन स्नानगृह बांधणे अर्थसहाय्य | १) सदर योजना मागासवर्गीय संवर्गातील दलितवस्तीमध्ये राबविण्यात येईल. २) प्रस्ताव सादर करतांना ग्रामसभेत कामास मान्यता घेतलेली असावी . |
शासकीय योजना
दलितवस्ती सुधार योजना: सदर योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये स्वच्छता विषयक सोयी,पाणी पुरवठा,समाजमंदिर, अंतर्गत रस्ते,गटार इत्यादी व्यवस्था करुन दलित वस्तींची स्थिती सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक गावास शासन् निर्णय दिनांक १४ नोव्हेंबर २००८ अन्वये लोकसंख्येच्या निकषानुसार जास्तीत जास्त रुपये १०.०० लाख अनुदान दिले जाते.सदर शासन निर्णयानुसार प्रत्येक दलित वस्तीला अनुसूचीत जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पुढीलप्रमाणे अनुदान मंजूर करणेत येते.
सदरचा प्रस्ताव शासन् धोरण व निर्णयातील तरतूदींनुसार योग्य त्या कागदपत्रांसह ग्रामसभेच्या मंजुरीने ग्रामपंचायती मार्फत प्रस्ताव तयार करुन गट विकास अधिकारी यांचेमार्फत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे सादर करणेत यावेत.
समाजकल्याण विभागामार्फत राबविणेंत येणा-या शिष्यवृत्ती
२) माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवर्त्ती - शिक्षणक्षेत्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते.सदर योजनेसाठी उत्पन्नाची अट नाही. प्रत्येक प्रवर्गातील प्रत्येक इयत्तेमधील गुणानुक्रमे प्रथम दोन विद्यार्थ्यांना कमीत कमी ५०% गुण आहेत त्यांना या योजनेमधुन मागासवर्गिय विद्यार्थ्यांना इ.५ वी ते ७ वी दरमहा रु. ५०/ आणि इ. ८ वी ते १० वी दरमहा रु.१००/- प्रमाणे दहा महिन्यांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची अट नाही व विदयार्थ्यास अर्ज करण्याची आवश्यकता नाही. यासाठी संबंधीत तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकारी यांचेकडे शाळेमार्फत प्रस्ताव सादर करण्यात यावेत.
३) इयत्ता ५ वी ते ७ वीमधील मागासवर्गीय मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती - मागासवर्गीय मुलींचे (अ.जा./वि.जा.भ.ज./वि.मा.प्र. प्रवर्गामधील) प्राथमिक शाळेमधील गळतीचे प्रमाण रोखण्याच्या दृष्टिने इ. ५ वी ते ७ वीमधील मुलींना दरमहा रु. ६०/ प्रमाणे दहा महिन्यांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. सदर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची अट नाही.नियमित उपस्थिती आवश्यक.ऑनलाइन लाभ देय.
४) इ. ८ वी ते १० वीमध्ये शिकणा-या अनु.जातीच्या मुलींकरीता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती - इ. ८वी ते १० मधील मागासवर्गीय मुलींचे (अ.जा./वि.जा.भ.ज./वि.मा.प्र. प्रवर्गामधील) गळतीचे प्रमाण रोखणे व मुलींचे शैक्षणीकदृष्टया प्रभावी गतीने प्रगती व्हावी या उद्देषाने शासनाने दिनांक १५ जुलै २००३ मध्ये ही योजना सुरु केली आहे.सदर योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थीनीस दरमहा रु. १००/ प्रमाणे दहा महिन्यांसाठी संबंधीत शिक्षण संस्थेमार्फत शिष्यवृत्ती अदा करणेत येते. सदर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची अट नाही.नियमित उपस्थिती आवश्यक.ऑनलाइन लाभ देय.
५) अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती : अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत शिकत असलेल्या मुलांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती देण्याची योजना राबविणेत येते. सदरची योजना केंद्ग पुरस्कृत असुन त्यासाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही. सदर शिष्यवृत्ती सर्व जाती/धर्माला तसेच परंपरागत अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना लागू आहे. उदा. कातडी कमविणे,कातडी सोलणे,मानवी विष्ठा वहन करणे,किंवा बंदिस्त व उघडया गटारांची साफसफाई करणारी व्यक्ती. सदर योजन्ोअंतर्गत शासन निर्णय दिनांक १७ मार्च २००९ नुसार रु. १,८५०/-(रुपये एक हजार आठशे पन्नास फक्त) शिष्यवृत्ती देण्यात येते.
६) औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणा-या अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणे : अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांना तांत्रीक शिक्षणाकडे वळविण्याकरीता औद्योगीक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेणा-या अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांना या योजनेमधुन विद्यावेतन दिले जाते. या योजनेसाठी पालकांचे उत्पन्न रु. १,००,०००/(रुपये एक लाख फक्त) पर्यंत मर्यादित असणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थ्यांना दरमहा रु. ६०/ पासून रु. १००/ पर्यंत विद्यावेतन देण्यात येते.
७) मागासवर्गीय अनुदानीत वसतीगृहांना सहायक अनुदान- सदर योजनेअंतर्गत अनुदानीत वसतीगृहातील लाभार्थ्यांना परिपोषण भत्ता दिला जातो.तसेच वसतीगृहांना भाडे अनुदान/परिरक्षअनुदान/व्यवस्थापन/भांडी कुंडी/फर्निचर इत्यादीसाठी अनुदान अदा करणेत येते.
८) आंतरजातीय विवाहीत दांपत्यांना प्रोत्साहापर अर्थसहाय देणे : अस्पृश्यता निवारण योजनेचा भाग म्हणून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आंतरजातीय विवाहीत जोडप्यांस आर्थीक सहाय्य देण्याची योजना सन १९५८ पासून् शासनातर्फेन्र राबविणेत येते. शासन्ा निर्णय दिनांक ३० जानेवारी १९९९ नुसार आर्थिक सहाय्यामध्ये वाढ करुन रु. १५,०००/- करण्यात आलेले आहेत. दिनांक ३१.१.२०१० पूर्वी ज्या दांपत्यांचे विवाह झाले असतील त्यांना रु.१५,०००/- (रुपये पंधरा हजार फक्त) चे शासनाने विहीत केलेनुसार धनाकर्ष,राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र व संसारोपयोगी साहित्य या स्वरुपात दिले जातात. तसेच शासन निर्णय क्रमांक आंजावि-२००७/प्र.क्र.१९१/मावक-२ विस्तार भवन मुंबई ३२ दिनांक १.२.२०१० च्या शासन् निर्णयानुसार वरिल अनुदानामध्ये वाढ करुन रु. ५०,०००/(रुपये पन्नास हजार फक्त) अनुदानाची रक्कम करणेत आली आहे. सदरची योजना विशेष मागास प्रवर्गातील जोडप्यांकरीताही लागू करणेत आलेली आहे.
१०) व्यसनमुक्ती प्रचार कार्य - सदरची योजना एप्रिल २००१ पासून जिल्हा परिषदेकडे वर्ग करणेत आली असुन या विभागाअंतर्गत प्रामुख्याने खालील कार्यक्रम राबविण्यात येतात.
१. दारुबंदी प्रचार कार्यक्रम
२. अंमली पदार्थ सेवन विरुध्द मोहिम
३. व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार योजना
४. केंद्रीय सामाजीक न्याय व अधिकारीता विभागातर्फे व्यसनमुक्ती केंद्र चालविणा-या संस्थांना अर्थसहाय्य.
११) शाहु,फुले आंबेडकर दलितवस्ती विकास व सुधारणा अभियान - संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियानाच्या धरतीवर महाराष्ट्र शासनाने सन २००६-०७ या वर्षापासुन शाहु,फुले आंबेडकर दलितवस्ती विकास व सुधारणा अभियान सुरु केले आहे. सदर अभियानाचा उद्देश दलित वस्त्यांमध्ये स्वच्छता राहण्यासाठी तेथील रहीवाश्यांचा सहभाग वाढावा तसेच गावातील सामाजीक विषमता दुर होऊन अस्पृश्यता नष्ट व्हावी हा आहे. सदर अभियानांतर्गत राज्यात गुणानुक्रम येणा-या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे रु. २५.०० लाख १५ लाख व १२.५० लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. १. पंचायत समिती स्तरावर प्रत्येक पं.स.तील गुणानुक्रमे पहिल्या तीन ग्रामपंचयतींना अनुक्रमे रु. २५,०००/-रु. १५,०००/ व रु. १०,०००/- २. जिल्हा स्तरावरील गुणानुक्रमे उत्कृष्ट ठरणा-या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे रु. ५.०० लाख रु. ३.००लाख व रु. २.०० लाख. ३. महसुल विभागस्तरावर उत्कृष्ट ठरणा-या गुणानुक्रमे पहिल्या एका ग्रामपंचायतीना रु. १०.०० लाख तसेच जास्त टक्केवारीसाठी राज्यातील पहिल्या तीन जिल्हा परिषदानां अनुक्रमे रु. १५.००लाख रु. १०.०० लाख व रु. ५.०० लाख सर्वात जास्त टक्केवारीकरीता राज्यातील पहिल्या तीन पंचायत समितींना अनुक्रमे रु. ७.५० लाख रु. ५.०० लाख व रु. २.५० लाख. दलितवस्ती विरहीत ज्या ग्रामपंचायतींची बक्षिसासाठी निवड होईल त्या ग्रामपंचायतींस रु. २५.०० लाख व सुवर्णपदक देण्यात येते. सदर अभियानाची सुरुवात दरवर्षी २० सप्टेंबर रोजी संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता अभियानाबरोबरच करावयाची असुन सदर अभियानात भाग घेण्यासाठी दलित कुटूंबांची लोकसंख्या किमान ५० असावी व अशा गावात अनु.जाती.,जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत गुन्हा दाखल झालेला नसावा.
समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तींकडे त्यांच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्यांकडे पाहून त्यांच्या मधील असलेले सुप्त सामर्थ्य विकसित करुन त्यांना समाज जीवनाच्या सर्व अंगामध्ये समान संधी, संपूर्ण सहभाग व त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय, तसेच इतर विविध विभागांमार्फत कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षिततेसाठी अपंगांना काही क्षेत्रामध्ये आरक्षण, सवलती, सूट व प्राधान्य देण्यात आलेले आहे. या सर्वांचे उद्देश अपंग व्यक्तींना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करणे हा आहे. त्या योजना खालीलप्रमाणे.
मुळातच अपंगत्व येऊ नये म्हणून अपंग प्रतिबंधात्मक कार्यक्रम, अपंग व्यक्तींचे सर्वेक्षण, शालेय आरोग्य तपासणी, जनजागृती, माता बाल संगोपन कार्यक्रम, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, वेयक्तिक स्वच्छता व आरोग्य इत्यादी कार्यक्रम आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येतात.
शिक्षण | अपंग विद्यार्थ्यांना विशेष शाळांमार्फत शिक्षण पालघर जिल्यामध्ये स्वयंसेवी संस्थांमार्फत दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिविकलांग विदयार्थ्यांसाठी ७ शाळा आहेत. |
योजनेचे स्वरुप | अपंग विद्यार्थी अतितीव्र अपंगत्वामुळे सामान्य मुलांबरोबर सामान्य शाळेत येऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी तसेच स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या अपंगांच्या विशेष शाळांमधून दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिविकलांगांसाठी शिक्षणाची सोय केली आहे. या शाळा निवासी व अनिवासी स्वरुपाच्या असून निवास, भोजनाची विनामुल्य सोय आहे. |
अटी व शर्ती |
|
संपर्क |
|
योजनेचे नाव | शालांत परिक्षा पूर्व शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती |
योजनेचे स्वरुप | सामान्य शाळेमध्ये तसेच अपंगांच्या विशेष अनिवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाची इयत्ता पहिली ते चौथी दरमहा रु. 50/- इयत्ता पाचवी ते सातवी दरमहा रु. 75/- इयत्ता नववी ते दहावी दरमहा रु. 100/- तसेच मतिमंदांच्या विशेष अनिवासी शाळेतील मतिमंद विद्यार्थ्यांना दरमहा रु. 75/- या दराने शिष्यवृत्ती देण्यात येते. |
अटी व शर्ती |
|
संपर्क |
|
योजनेचे नाव | शालांत परिक्षोत्तर शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती |
योजनेचे स्वरुप | अंध, अधूदृष्टी, कुष्ठरोगमुक्त, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी नंतरचे महाविद्यालयीन व्यावसायिक, तांत्रिक व अभियांत्रिकी शिक्षणासाठी त्यांच्या अभ्यासक्रमाच्या दर्जाप्रमाणे अभ्यासक्रमाचे गट करुन शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात येते. त्याचप्रमाणे अंध विद्यार्थ्यांना वाचक भत्ता तसेच सर्व अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती बरोबर शैक्षणिक शुल्क, प्रकल्प टंकलेखन खर्च, अभ्यास दौरा खर्चाची रक्कम दिली जाते. |
अटी व शर्ती |
|
संपर्क |
|
योजनेचे नाव | कार्यशाळांमधून अपंगांना व्यवसाय प्रशिक्षण |
योजनेचे स्वरुप | 18 ते 45 वयोगटातील प्रौढ अपंग व्यक्तींना सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या अपंगांच्या कार्यशाळेमधून रोजगार व स्वयंरोजगाराचे वेगवेगळया व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण निवासी व अनिवासी देण्यात येते. राज्यात चार शासकीय कार्यशाळा आणि एक औद्योगिक प्रशिक्षण केंद्र व 78 स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या कार्यशाळा आहेत. |
अटी व शर्ती |
|
संपर्क |
|
योजनेचे नाव रोजगार व स्वयंरोजगार : | अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल |
योजनेचे स्वरुप | 18 ते 50 वयोगटातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिविकलांग अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी रु. 1,50,000/- च्या व्यवसायाकरीता 80% बँकेमार्फत कर्ज व 20% अथवा कमाल रु. 30,000/- अनुदान स्वरुपात दिले जाते. |
अटी व शर्ती |
|
संपर्क |
|
योजनेचे नाव | अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे |
योजनेचे स्वरुप | शारिरीक पुनर्वसनाच्या दृष्टीने अस्थिविकलांग व्यक्तींकरीता कॅलिपर्स कृत्रिम अवयव, तीन चाकी सायकल, कर्णबधिरांकरीता श्रवणयंत्र व अंध व्यक्तींना चष्मे, काठया तसेच इयत्ता दहावी नंतरचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अंध विद्यार्थ्यांना टेप रेकॉर्डर व दहा कोऱ्या कॅसेट्सचे संच दिले जातात. |
अटी व शर्ती |
|
संपर्क |
|
योजनेचे नाव | अपंग व्यक्तींना एस.टी. प्रवास भाडयामध्ये प्रवास सवलत |
योजनेचे स्वरुप | अपंग व्यक्तींना दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे एस.टी. प्रवास भाडयामध्ये अपंग व्यक्तीस 75% व त्याच्या सोबत्यास 50% प्रवास सवलत देण्यात आली आहे. |
अटी व शर्ती |
|
संपर्क |
|
अपंग कल्याण व पुनर्वसनाच्या विविध योजना केंद्र शासन, राज्य शासन व जिल्हा परिषदेमार्फत कार्यान्वित आहेत. तथापि ग्रामिण भागातील अपंग व्यक्ती व त्यांचे पालक यांना या योजनांची माहिती नसल्याने पात्र अपंग व्यक्ती या योजना मिळण्यापासून वंचित राहतात.
या विविध योजनांबरोबरच समाजात अपंगत्व प्रतिबंधात्मक उपाय, अपंगांचे शिक्षण/प्रशिक्षण व पुनर्वसन यांची अनुषंगिक माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यासाठी पालघर जिल्हयाच्या प्रत्येक तालुक्यात अपंगांचे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.
अपंग विदयार्थ्यांमध्ये असलेल्या क्रिडागुणांना वाव देण्यासाठी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधुन विशेष अपंग मुलांच्या क्रिडास्पर्धा जिल्हासतरावरुन आयोजित केल्या जातात.
जिल्हा परिषद सेस फंडातुन 3% अपंग कल्याण योजनेतुन अपंगांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणेंत येते.
समाजकल्याण समिती.
मा.धर्मा दावजी गोवारी -सभापती
श्री.राजेंद्र पाटील - सचिव तथा समाजकल्याण अधिकारी, (गट अ)
1)मा.श्री. दिलीप जयराम गाटे | सदस्य |
2) मा..श्री. राजाराम वामन तांडेल | सदस्य |
3)मा..श्री. भालचंद्र बुधाजी खोडके | सदस्य |
4)मा..श्री. किशोर बारकु बरड | सदस्य |
5) मा..श्रीम.नेहा नरेश शेलार | सदस्य |
6) मा..श्रीम.निता समीर पाटील | सदस्य |
7) मा..श्रीम. धनश्री धनंजय चौधरी | सदस्य |
8) मा..शुभांगी राजेश कुटे | सदस्य |
9)मा.दिपा शांताराम ठेमका | सदस्य |
जिल्हा परिषद योजना | |
1 | मागासवर्गीयांना नवीन घर बांधणेसाठी अथवा घर दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य करणे |
2 | मागासवर्गीयांना नवीन घर बांधणेसाठी अथवा घर दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य करणे |
3 | इ.५ वी ते ९ वीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकली पुरविणेसाठी बर्ज |
4 | मागासवर्गीय महिलांना व पुरुषांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन पुरविणेसाठी अर्ज |
5 | मागासवर्गीय गरोदर महिलांना शासकिय संस्थांमध्ये बाळंत झाल्यास त्यांना मच्छरदाणी व अनुषंगिक साधणे पुरविणे |
6 | मागासवर्गीय लाभार्थ्यांना घरघंटी पुरविणेसाठी अर्ज |
7 | मागासवर्गीयांना पापड मशिन पुरविणेसाठी अर्ज |
8 | मागावर्गीय लाभार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्यसाठी अर्ज |
9 | मागासवर्गीय लाभार्थ्यांना बॅजो पुरविणेसाठी अर्ज |
10 | मागासवस्तीत समाज मंदिरामध्ये खुर्च्या,भांडी,सतरंजी पुरविणेसाठी अर्ज |
11 | २०% निधीमधून मागासवर्गीय वस्तीमध्ये अंतर्गत रस्ते बांधकामासाठी अनुदान मागणी अर्ज |
शासकीय योजना | |
1 | चेकलिस्ट(दलित वस्ती सुधार योजना ) जि.पालघर |
2 | आंतरजातीय विवाह योजनेआंतर्गत आर्थसहाय्य मिळण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना |
3 | सुचीपत्र |
4 | अस्वछ्य व्यवसायात काम करणा-या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती |
आस्थापना विषयक माहिती |
अ) विभागाचे नांव:- जिल्हा समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद पालघर
ब)कार्यालय प्रमुखाची माहिती
कार्यालय प्रमुखाचे नांव | पदनाम | कार्यालयाचा दुरध्वनी | निवास दुरध्वनी |
श्री. राजेंद्र पाटील | समाज कल्याण अधिकारी,(गट-अ)अतिरिक्त कार्यभार मुळ आस्थापना महिला बालकल्याण अधिकारी | 9004051707 |
अ.क्र. | संवर्ग | मंजुर पदे | भरलेली पदे | रिक्त पदे | १ | कार्यालयान अधिक्षक/कनिष्ठ प्रशासकिय अधिकारी | १ | ० | १ |
२ | वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता | १ | ० | १ |
३ | सहाय्यक सल्लागार | १ | ० | १ |
४ | समाज कल्याण निरिक्षक | ५ | ० | ५ |
५ | सहाय्यक लेखाधिकारी | १ | १ | ० |
६ | वरिष्ठ सहाय्यक | २ | १ | १ |
७ | कनिष्ठ सहाय्यक | १ | ० | १ |
८ | वाहन चालक | १ | ० | १ |
९ | चतुर्थश्रेणी कर्मचारी | ३ | ० | ३ |
१६ | २ | १४ |
अ.क्र. | अधिकारी/कर्मचा-याचे नांव व हुद्दा | कामाचे स्वरुप | शेरा |
१ | क. प्रशासकिय अधिकारी (पद रिक्त) | कर्मचा-यांच्या कामावर देखरेख ठेवणे,काम करवून घेणे | |
२ | सहाय्यक लेखाधिकारी | लेखा विषयक संपूर्ण कामाकाज,लेखा परिक्षणाचा निपटारा करणे,मासिक खर्चाची माहिती ,आर्थिक तरतूद मागणी, महालेखापाल ताळमेळ खर्च, | |
३ | वरीष्ठ सहाय्यक (1-पद रिक्त) | जिल्हा परिषद २०% सेस फंडातील योजना ,समाज कल्याण समिती सभा, सभेचे अजेंडा व इतिवृत्त मा. सदस्य व वरिष्ठांना पाठविणे, आस्थापना कर्मचारी यांचे वेतन करणे. | |
४ | कनिष्ठ सहाय्यक (1-पद रिक्त) | कार्यालयाची संपुर्ण आस्थापनाचे कामाकाज करणे,कर्मचा-याचे हजेरी पत्रक ठेवणे किरकोळ रजा नोंदवही ठेवणे,कर्मचा-यांचे मुळ सेवापुस्तके अद्यावत करणे व नोंदी ठेवणे,कर्मच-यांची अर्जित रजा ,परावर्तीत रजा मंजुर करणे,वार्षिक वेतनवाढी काढणे नोंदवही ठेवणे,माहितचा अधिकार आवक जावक पाहणे इ. कामे तसेच सलेअ यांना सहाय्यक | |
५ | समाज कल्याण निरिक्षक ( 5-पद रिक्त) | वसतीगृहास मान्यता देणे,वसतीगृहातील कर्मचा-याचे वेतन अदा करणे,आंतरजातीय विवाहीतांना प्रोत्साहनपर अनुदान वाटप,७ % वन महसुल प्रस्तांवाना मंजूरी घेणे,वृध्द कलाकांराचे मानधन योजना पाहणे वृध्दाश्रम योजना इ. दलित वस्ती सुधार योजनेचे कामाकाज पाहणे.आय.टी. आय. अनु जाती प्रशिक्षणार्थीना विद्यावेतन ,शासनाच्या राबविण्यात येणा-या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती,१० वी परिक्षा फी प्रदान करणे.अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती देणे. व्यसनमुक्ती कार्यक्रम राबविणे, | |
६ | सहाय्यक सल्लागार (2-पद रिक्त) | अपंगाच्या विशेष शाळाचे वेतनाचे काम पाहणे, अपंग लाभार्थ्यांना बिजभांडवल योजना राबविणे,अपंग लाभार्थ्यांना एस.टी. प्रवास सवलती करीता ओळखपत्र देणे,अपंग विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीची कामे पाहणे. | |
कार्यरत ३ पदाकडुन वरील कामे एकत्रितपण केली जातात. |